Breaking News

रोटरी व्हॉलीबॉल स्पर्धेत गार्डन टीमचे सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त

येथे रविवारी (दि. 26) सिडको गार्डन पनवेल पिल्ले कॉलेजसमोर रोटरी क्लब इंडस्ट्रीयल टाऊन पनवेल यांच्या विद्यमाने रोटरी व्हॉलीबॉल स्पर्धा 2019 आयोजित करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महाराष्ट्र राज्याचे डेप्युटी (स्पोर्ट्स) डायरेक्टर श्री. मोटे, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचे अध्यक्ष व्ही. सी. म्हात्रे, इनरविलच्या क्लब ऑफ पनवेलच्या अध्यक्षा वैशाली म्हात्रे यांची उपस्थिती होती. अटीतटीच्या अंतिम सामन्यात गार्डन व्हॉलीबॉल टीमने या विजेतेपद पटकावले. किसन पवार (कॅप्टन) यांच्या नेतृत्वाखाली श्री. कांबळे, संजय सिंग, श्री. महाले, श्री. दिनेश, श्री. रोबटी यांचा विजयी संघात सहभाग होता. रोटरीयन श्री. पनाले, गुरुदेव सिंग कोहली, चारुदत्त भगत, डॉ. जय भंडारकर आदी मान्यवर स्पर्धेला उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. धोगडे, श्री. गुरू, विनोद तरेकर, नितीन गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply