Breaking News

सिडकोच्या रेल्वेस्थानक संकुलातील कार्यालयांची ई-लिलाव पद्धतीने विक्री

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

सिडको महामंडळाच्या गृहनिर्माण योजना, तसेच वाणिज्यिक व रेल्वेस्थानक संकुलांतील दुकानांची आणि कार्यालयांची विक्री ई-लिलाव पद्धतीने करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला सिडको संचालक मंडळाने डिसेंबर 2018 मध्ये मान्यता दिली आहे.

सिडकोतर्फे दुकाने वा कार्यालयांच्या विक्रीकरिता यापूर्वी पारंपरिक मानवीय निविदा पद्धतीचा वापर करण्यात येत होता. सदर विक्री प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक, अचूक व जलद पद्धतीने पार पडावी, तसेच सिडकोतर्फे जाहीर करण्यात येणार्‍या योजनांची व्याप्ती वाढून त्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचाव्यात व या योजनांस मिळणारा लोकांचा प्रतिसादही लक्षणीयरीत्या वाढावा या उद्देशाने यापुढे ई-लिलाव पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

विविध रेल्वेस्थानक संकुलांतील कार्यालयांच्या ई-लिलाव सोडतीची प्रक्रिया प्रथमच ऑनलाईन पद्धतीचा वापर करून सोमवारी (दि. 10) रोजी सुरू झाली आहे. त्यासाठी सिडको महामंडळाच्या हीींिीं://लळवले.िीेर्लीीश247.लेा या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करण्याची सुविधा इच्छुक अर्जदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई-लिलावांतर्गत कार्यालयांच्या बोली लावण्याकरिता सहभागी स्पर्धकांना मूळ रकमेत 10 हजार रुपयांच्या पटीत वाढ करावी लागेल. त्यापेक्षा कमी पटीतील बोली स्वीकारली जाणार नाही. ई-लिलाव प्रक्रियेतील यशस्वी बोलीदारांची नावे दि. 8 जुलै 2019 रोजी जाहीर करण्यात येतील.

Check Also

एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही; आम्ही तुमच्या ठामपणे पाठीशी!

आमदार प्रशांत ठाकूर यांची बैठकीत ग्वाही पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल एसटी बसस्थानक ते रेल्वे स्टेशन …

Leave a Reply