मुरुड जंजिरा : प्रतिनिधी
मुरुड जंजिरा येथील खोरा बंदराला प्रवासी शासनाकडून जेट्टीसाठी 11.27 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. खोरा बंदर येथून जंजिरा किल्ल्यासाठी प्रवाशी जलवाहतूक सुरळीत सुरू आहे, मात्र जंजिरा किल्ल्यात जाणार्या पर्यटकांची संख्या वाढल्याने समुद्राच्या ओहोटीला प्रवाशी वाहतूक करणार्या बोटी जेट्टीला लागत नाहीत. प्रवाशांना चढणे उताराने त्रासाचे होते. त्यासाठी मेरीटाईम बोर्डाने समांतर लांब जेट्टी बांधण्याचा प्रस्ताव 7 जानेवारी 2022 रोजी शासनाला दिला होता. शासनाने मुरुडच्या पर्यटन वाढीसाठी 6,4,2022 रोजी खोरा बंदर जेट्टी लांबी वाढून नवीन समांतर जेट्टी बनवण्यासाठी 11.27 कोटीचा निधी एका परिपत्रकाद्वारे मंजूर केला आहे. हा निधी मेरीटाईम बोर्डाकडे वर्ग होऊन काम मेरीटाईम बोर्ड करणार आहे. सी.आर.झेड परवानगी प्राप्त झाल्यावर अंदाजपत्रक होईल असे मिरीटाइम बोर्डाचे अधिकारी सुधीर देवरे यांनी सांगितले. दरम्यान 1961 साली पूर्वी कोकणातील लोकांचा मुबईकडे जाण्याचा प्रवास समुद्रमार्गेच होता. रत्नागिरीहून मोठे जहाज निघायचे व मुरुडची व्यापारी खोराबंदरातून त्या जहाजात बसल्याचे सकाळी मुबंईत पोहचत असे.1961 साली एसटी सुरु झाली. बंदरातील जलवाहतूक बंद झाली आणि खोरा बंदराचे महत्त्व कमी झाले. नंतर खोरा बंदर मासेमारीसाठी कोळी बांधव वापरु लागले. अनेक वर्षानंतर पर्यटकांसाठी जंजिरा किल्ल्यात जाणारी जलवाहतूक सुरु झाली व पुन्हा एकदा खोरा बंदराला सोन्याचे दिवस आले. दोन वर्षांपूर्वी शासनाने 300 वहनक्षमता असलेले वाहन तळ एक कोटी खर्च करून बनवले. परंतु पर्यटकांसाठी अजूनही खुले करण्यात आले नाही. एक कोटीचे वाहनतळ व जेट्टी पर्यंतचा रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले. अजूनही त्या रस्त्यावर डांबरीकर झाले नाही. पर्यटकांना धुळीला सामोरे जावे लागत आहे. या 11 कोटीच्या नुतन जेट्टीमुळे मुरुडच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक खास मुरुडला येतो. जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी 5 वाजेपर्यंतच खुला असल्याने पर्यटकांना दुपारीच किल्ल्यात जाण्यासाठी रांगा लावायला लागत आहेत. एप्रिल महिन्यात कडक उन्हामुळे रंगात उभे राहणे पर्यटकांना खूप त्रासदायक होत आहे.
-जोत्स्ना सलगरे, पर्यटक
खोरा बंदराचे लवकरच पार्किंग सुरु होईल व पर्यटकांसाठी एक कोटीचे मोठी निवारा शेड,जेट्टी पर्यंत सावलीसाठी छप्पर व रस्ता डांबरीकरणाचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेत आहेत.
-सुधीर देवरे, अधिकारी मेरीटाईम बोर्ड