खारघर भाजपची मागणी
खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर विभागात सोनसाखळी चोरी (चेन स्नॅचिंग), मोबाईल चोरी भर दिवसा असे अनुचित प्रकार घडत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यावर तातडीने उपाययोजना म्हणून बीट मार्शल तैनात करण्यात यावे, अशी विनंती खारघर भाजपच्या वतीने खारघर, नवी मुंबई पोलिसांना करण्यात आली आणि त्यांनी ही मागणी त्वरित मान्य केली.
या वेळी खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक प्रवीण पाटील, रामजी बेरा, नगरसेविका हर्षदा उपाध्याय, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, उपाध्यक्ष संजय घरत, सरचिटणीस युवा मोर्चा अमर उपाध्याय, सुमीत सहाय आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.