Breaking News

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे पनवेलमध्ये प्रवेश सुरू

पनवेल : वार्ताहर

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाचे प्रवेश पनवेलमध्ये सुरू झाले असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्र शासनाने 1989 मध्ये स्थापन केले असून विद्यापीठाला युनिव्हर्सिटी ग्रॅण्ड कमिशन (युजीसी) व डिस्टन्स एज्युकेशन ब्युरिया (डीईबी) भारत सरकार यांची मान्यता आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने यशवंत मेमोरियल ट्रस्ट या संस्थेला एमबीए, एमकॉम, बीसीए, बीकॉम, बीए, प्रिपोटरी कोर्स फॉर एसएससी पास व नापास विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाचे अधिकृत अभ्यासकेंद्र म्हणून 2008पासून मान्यता दिलेली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पदवी इतर पारंपरिक विद्यापीठाच्या पदवीशी समकक्ष असून विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी एमपीएससी, यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. एमबीए, एमकॉम, बीसीए, बीकॉम, बीए, प्रिपोटरी कोर्स फॉर एसएससी पास व नापास या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इच्छुकांनी यशवंत मेमोरियल ट्रस्ट, अशोक गार्डन, बी 14, जुन्या पोस्टाजवळ, महात्मा फुले मार्ग पनवेल, भ्रमणध्वनी 9819248771, 9819540448 येथे संपर्क साधावा.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply