Breaking News

हरवलेल्या तरुणाला भेटली घरची माणसं

खोपोली : प्रतिनिधी

तामिळनाडूमधील कंडलूर जिल्ह्यातील एक तरुण मागील पंधरा दिवसापासून खोपोली शीळफाटा येथील वन खात्याच्या तपासणी चौकीच्या परिसरातील एका झाडाखाली वास्तव्यास होता. तरुण कोण असावा व त्याचे गाव व घरची माणसं कुठे असतील या बाबत या तपासणी चौकीवरील वन कर्मचार्‍यांनी माणुसकीच्या नात्याने चौकशी सुरू केली.

काही दिवसांपुर्वी हा तरुण त्याचे घरदार सोडून आला होता.  त्याला स्मृतीभ्रंश झाला होता. शिवाय भाषेच्या अडचणीमुळे तो काहीही सांगू शकत नव्हता. वनकर्मचार्‍यांनी त्याच परिसरातील चहा टपरी चालविणार्‍या एका तामिळी व्यक्तीकडून या तरुणाची सर्व माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वन कर्मचारी  महेश अहिरराव, जितेंद्र नाईक, पोलीस अधिकारी बबन घुले व सामाजिक कार्यकर्ते श्याम धानीवले यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले व त्यांनी  तामिळनाडूमधील ‘त्या‘ तरुणाचे गाव व घरातील माणसांची माहिती शोधून काढली व सदर तरुणाला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply