Breaking News

सुधागडच्या सुष्मिताचे पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुयश ; कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी होणार निवड, पाच सुवर्णांसह 32 पदकांची मानकरी

ठाणे ः प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील वाघोशी गावचे रहिवासी सुनील देशमुख यांची कन्या सुष्मिता देशमुखने 17 जूनला केरळमध्ये पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल पॉवर लिफ्टिंग

स्पर्धेत 47 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे, तर आगामी कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी सुष्मिताची निवड भारतीय संघात होणार आहे. विशेष म्हणजे सुष्मिताने आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉवर लिफ्टिंग स्पर्धांमध्ये पाच सुवर्ण पदकांसह 32 पदकांची कमाई केली आहे. तिच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, आयटी क्षेत्रात मुलींचा दबदबा वाढताना दिसत आहे. क्रीडा क्षेत्रातही मुलींचे वर्चस्व कायम आहे. मेरी कोम, गीता-बबिता भगिनी, सायना नेहवाल, सानिया मिर्झा यांसारख्या असंख्य मुलींनी त्या त्या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकवला आहे. आता  पॉवर लिफ्टिंगसारख्या अवजड क्रीडा प्रकारात विटाव्यातील एका सामान्य कुटुंबात राहणारी सुष्मिता देशमुख ही आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धांमध्ये सहभागी होऊन सर्वोेत्तम कामगिरी करीत आहे. 17 जून रोजी केरळ येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत गटात रौप्यपदक जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे.  विशेष म्हणजे आगामी कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी तिची निवड भारतीय संघात होणार असल्याचे तिने सांगितले. तिने दुबईतील आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेतही उत्तम कामगिरी बजावली आहे.  सध्या ती गोवेलीतील जीवनदीप कॉलेजमध्ये एम. कॉमच्या दुसर्‍या वर्षात शिकत आहे. ती कारभारी जिममधून प्रशिक्षण घेत असून प्रशिक्षक विनायक कारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने ही यशाची शिखरे गाठली आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही खेळण्याची जिद्द सुष्मिताने सोडली नाही. तिला विटाव्यातील मराठा समाज संघाच्या कार्यकर्त्यांनीही आर्थिक मदतीचा हात दिला आहे, तर सुधागड तालक्यातील वाघोशी गाव येेथील रहिवासी असल्याने रहिवासी सेवा संघ, ठाणे, मुंबई, पुणे यांनीदेखील तिला उज्ज्वल यशासाठी शुुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply