नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापाकिस्तानचे माजी कसोटीपटू मोहसीन खान यांनी भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाक क्रिकेट बोर्डातील आपल्या क्रिकेट कमिटी चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे काम मोहसीन खान यांच्याकडे होते, मात्र खान यांनी पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांना आपल्याला जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती केली होती. बोर्डाचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहणारे वासिम खान मोहसीन यांच्या जागी काम पाहणार आहेत.
Check Also
विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर
उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …
RamPrahar – The Panvel Daily Paper