पनवेल : वार्ताहर
मॉस्को (रशिया) येथे नुकत्याच झालेल्या जागतिक युनिफाइट स्पर्धेसाठी भारताच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. या खेळाडूंचे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये पलक राजन कडू (धुतुम) हिने 25 किलोखालील वजनी गटात प्रथम क्रमांक, प्रांजल सचिन पाटील (कळंबुसरे) हिने 32 किलोखालील वजनी गटात रौप्यपदक, तर मानस मनीष पाटील (जांभूळपाडा) याने 50 किलोखालील वजनी गटात कांस्यपदक पटकावून रायगडसह राज्याचे नाव उंचावले. तिन्ही खेळाडू प्रशिक्षक सागर रमाकांत कोळी आणि सूरज टकले यांच्याकडे युनिफाइट आणि मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत आहेत.
या स्पर्धकांचे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर, उपाध्यक्ष रवींद्र म्हात्रे, विनित साठ्ये, कल्याण रॉय चौधरी, चिंतामणी मोकल, प्रशांत गांगर्डे, नीलेश भोसले, पीयूष सदावर्ते, प्रतिक कारंडे, स्वप्नाली सणस, आदेश शेपोंडे, सुजय वेंगुर्लेकर आणि सर्व पदाधिकार्यांनी कौतुक केले.