Breaking News

महसुली अधिकार्यांच्या बदल्या

उपजिल्हाधिकारी दर्जाच्या 27 अधिकार्‍यांचा समावेश

पनवेल : बातमीदार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागाच्या महसूल विभागात उपजिल्हाधिकारी संवर्गांतील बदल्यांचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले. नियमाप्रमाणे करण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये उपजिल्हाधिकारी दर्जाच्या तब्बल 27 अधिकार्‍यांचा समावेश आहे. ठाणे, कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई या सहा जिल्ह्यांत बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणुकीशी संबंधित पदे भरणे आवश्यक असल्यामुळे बदल्या करून पदस्थापना करण्यात आली आहे. यामध्ये रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांची बदली मुंबईतील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुंबई शहरच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाड यांची नियुक्ती झाली. सिंधुदुर्गचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी आणि सिंधुदुर्गच्या वन जमाबंदी अधिकारी शुभांगी साठे यांची परस्पर बदली करण्यात आली. रायगडच्या सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी या रिक्त जागेवर निवासी उपजिल्हाधिकारी पद्मजा कोळपकर यांची, वांद्रे 2 उपजिल्हाधिकारी या रिक्त जागेवर ठाणे रोहयो उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी यांची, अंधेरी 2 उपजिल्हाधिकारी या रिक्त जागेवर अंधेरी एमआयडीसीचे महाव्यवस्थापक वैशाली लंभाते, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले आर. पी. ठाकूर यांची ठाण्याचे रोहयो विभागाच्या उपजिल्हाधिकारी पदावर; तर ठाण्याचे उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांना पदोन्नती देऊन बोरिवली 1च्या उपजिल्हाधिकारी पदावर नेमणूक करण्यात आली आहे. सातार्‍याचे उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे यांची ठाण्याच्या उपविभागीय अधिकारी पदी, पालघर सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांची मालाड 2 उपजिल्हाधिकारी या रिक्तपदावर, ठाणे झोपुप्राचे उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांची उपजिल्हाधिकारी ठाणे सामान्य प्रशासन या रिक्त पदावर, अंधेरीचे मुद्रांक जिल्हाधिकारी संजय जाधव यांची ठाणे झोपुप्राच्या उपजिल्हाधिकारी पदावर, पनवेल मेट्रो सेंटर 1च्या उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांची अंधेरीच्या उपजिल्हाधिकारी पदावर, सिंधुदुर्गचे जिल्हा पुरवठा अधिकारी नितिन राऊत यांची दापोलीच्या उपविभागीय अधिकारी पदावर, जयराम देशपांडे यांची मेट्रो सेंटर पनवेल 1च्या उपजिल्हाधिकारी पदावर, कोकण विभाग भूसंपादन उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांची निवासी उपजिल्हाधिकारी पश्चिम उपनगरे मुंबई, राजापूर रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी अभय करगुटकर यांची कोकण विभाग उपजिल्हाधिकारी, धारावी पुनर्वसन प्रकल्प म्हाडाच्या भूसंपादन अधिकारी रूपाली भालके यांची ठाणे झोपुप्रा 3च्या उपजिल्हाधिकारी पदावर, उपजिल्हाधिकारी विनोद गोसावी यांची राजापूरच्या उपविभागीय अधिकारी पदावर, काळ प्रकल्प 2 माणगावच्या उपजिल्हाधिकारी प्रतिभा इंगळे यांची विशेष भूसंपादन अधिकारी धारावी पुनर्वसन प्रकल्प या पदावर, ठाणे मेट्रो 2चे भूसंपादन अधिकारी संगीता टकले यांची भूसंपादन अधिकारी, मुंबई तथा मतदार नोंदणी अधिकारी घाटकोपर या पदावर; तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले उमेश बिरारी यांची उपविभागीय अधिकारी मुंबई या पदावर, उपजिल्हाधिकारी संजय आहिरे यांची पालघर उपजिल्हाधिकारी पुरवठा या पदावर, उपजिल्हाधिकारी मिलिंद गांगुर्डे यांची उपजिल्हाधिकारी पुनर्वसन रायगड या पदावर, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत मोहिते यांची कणकवली सिंधुदुर्गच्या उपविभागीय अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे आदेशात

म्हटले आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply