पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील घोट येथे गावदेवी क्रिकेट क्लबच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष नितेश पाटील आणि भाजप तालुका चिटणीस नवनाथशेठ पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक प्रवीण पाटील, युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष नितेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील, कैलास पाटील, प्रकाश पाटील, हनुमान दारावकर, शिवा गोंधळी, हरिश्चंद्र कोळी, विश्वनाथ पाटील, बाळाराम पाटील, प्रभाकर पाटील, चंद्रकांत पाटील, शैलेश कोळी, तकदीर पाटील, रूपेश निघुकर, संभाजी गोंधळी, लहू पाटील, प्रशांत दारावकर, श्रीकृष्ण निघुकर, सतीश पाटील, कुमार पाटील आदींसह खेळाडू व दर्शक उपस्थित होते.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …