पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून खालापूर तालुक्यातील घोडीवली गावातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
भाजपच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात विकासकामे वेगाने सुरू आहेत. पक्षाच्या माध्यमातून होणार्या या विकासकामांवर प्रभावित होऊन तसेच भाजपचे खोपोली शहर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्यातील घोडीवली गावातील रूपेश फराट, निखिल फराट, गणेश पिंगळे, संजय देवकर, प्रसाद पिंगळे, शरद पिंगळे प्रसाद भोसले यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले.
भाजपच्या पनवेल येथील तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, दीपक बेहेरे, खोपोली शहराध्यक्ष राहुल जाधव, उपाध्यक्ष दीपक पवार, विकास नाईक, माजी नगरसेवक अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, कर्जत विधानसभा विस्तारक हेमंत नांदे, कर्जत मंडल अध्यक्ष राजेश भगत, खोपोली शहर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
उलवे नोडमध्ये गुरुवारपासून ‘नमो चषक’
पनवेल : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व …