Breaking News

सेवा सहयोगच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पनवेल ः प्रतिनिधी : येथील सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई व गवाणे ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक विद्यामंदिर गवाणे, जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा गवाणे व इतर शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत स्कूल किटचे वाटप करण्यात आले. तसेच दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येेत आहे. सामाजिक बांधिलकी जपत गवाणे पंचक्रोशीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गवाणे, दारूम, दारूम गावडेवाडी, शिरवली, नाद, वाघिवरे, वेळगिवे, शिडवणे कोणेवाडी या गावातील शाळांतील विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अंकुश राणे, संतोष 

पांचाळ, संजय गवाणकर, महेश आयरे, प्रमोद गोरुले, संस्थेचे अध्यक्ष अशोक तळेकर, पंचक्रोशी माध्यमिक विद्यामंदिर गवाणचे  मुख्याध्यापक ए. एच. मुल्ला तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

मार्चमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत 84.40 टक्के गुण मिळविणार्‍या सायली अशोक गुरव नाद हिचा जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माध्यमिक विद्यामंदिर गवाणे शाळेची विद्यार्थीनी अस्मिता सूर्यकांत जाधव, वाघिवरे (81.40 टक्के), चिन्मयी महेश सावंत हिचादेखील सत्कार मंडळाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मालणकर यांच्या हस्ते करण्यात आला.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply