Breaking News

नियमांचे पालन न केल्याने पनवेलमध्ये कोरोना रुग्णांत वाढ

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून बुधवारी एकाच दिवशी 119 रुग्ण आढळले.  त्यामुळे बाधितांची संख्या दिवसाला शंभपर्यंत पोहचत असल्याने प्रशासन चिंताग्रस्त झाले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने खाटांचे नियोजन सुरू केले आहे.

पनवेल पालिका क्षेत्रात यापूर्वी एकाच दिवशी सर्वाधिक अडीचशे कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर प्रमाण कमी होत दिवाळीपूर्वी दिवसाला 18 पर्यंत रुग्णसंख्या खाली आली होती. मात्र दिवाळीत मुखपट्टी न घालणे व सामाजिक अंतराचा नियम न पाळल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या प्रतिदिनी 60 ते 89 रुग्णांची नोंद पुन्हा होऊ लागली आहे.

पनवेलमध्ये आतापर्यंत 25 हजार हून अधिक कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 23 हजार 916 रुग्ण बरे झाले आहेत. 576 जणांचा मृत्यू झाला आहे. शंभरीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या जात असली तरी शाळा सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याने पनवेलमधील 2510 शिक्षकांच्या कोरोना चाचणीचे नियोजन आहे.

नवी मुंबईत उपचाराधीन रुग्ण अधिक

नवी मुंबईत दिवाळी सणानंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. गेल्या पाच दिवसात 752 बाधितांची भर पडली आहे. मात्र बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण कमी असून ही संख्या 587 इतकी आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांत वाढ झाली आहे. सद्यस्थितीत 1433 रुग्ण उपचार घेत आहेत.

रुग्णसंख्या वाढत असली तरी पालिकेकडे उपलब्ध खाटांची संख्या पुरेशी आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेली कोरोना काळजी केंद्र पुन्हा सुरू करण्याची सध्या गरज नसल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. दिवाळीपूर्वी उपचाराधीन रुग्णांची संख्या ही प्रथमच दोन हजारंच्या खाली आली होती. 11 नोव्हेंबर रोजी सर्वात कमी म्हणजे 1247 रुग्ण उपचार घेत होते. प्रतिबंधित क्षेत्रही दोनच शिल्लक होती. मात्र दिवाळीनंतर नियंत्रणात आलेली ही संख्या आता वाढत आहे. शंभरच्या खाली आलेली रुग्णसंखा आता परत दोनशेपर्यंत पोहचली आहे.

नवी मुंबईत उपचाराधीन रुग्णांची संख्या 3500पर्यंत पोहचली होती. दिवाळीत ही संख्या 1200 पर्यंत खाली आली होती. आता यात काहीशी वाढ झाली असून सद्यस्थितीत 1433 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.

उपचाराधीन रुग्ण वाढले तरी लगेच कोरोना काळजी केंद्र पुन्हा सुरू करण्याची आता गरज नाही. वेळ आल्यास 24 तासात आरोग्यसेवा पूर्ववत करता येईल. परंतू नागरिकांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे.

-संजय काकडे, अतिरिक्त आयमुक्त, महापालिका

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply