पनवेल ः वार्ताहर
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने अंबिका कुटीरच्या सहयोगाने गोरदेज स्काय गार्डन सोसायटी, क्लब हाऊस तक्का गाव येथे आरोग्य जागृती व योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगरसेवक अजय बहिरा, डॉ. मुकादम यांनी योगाविषयी माहिती दिली. क्लब हाऊस, गोदरेज स्काय गार्डन सोसायटी येथे झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक अजय बहिरा, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. मुकादम आदी उपस्थित होते.