Breaking News

‘रानसई’त दहा दिवस पुरेल इतका पाणी साठा

उरण ः वार्ताहर

उरणला पाणी पुरवठा करणार्‍या रानसई धरणात अवघ्या दहा दिवस पुरेल इतकाच पाणी साठा असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता रणजित बिरंजे यांनी पत्रकारांना दिली. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

यावर्षी पावसाने दडी मारल्याने पाणी टंचाईचा सामना राज्यभर अनेक ठिकाणी करावा लागत आहे. यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. त्याचबरोबर अनेक धरणाने पाण्याचा तळ गाठला आहे. उरणमधील रानसई धरणाचीही अवस्था वेगळी नाही.  या धरणातून उरणमधील 25 ग्रामपंचायती, उरण नगरपालिका तसेच औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी (दि. 26 जून) या दिवशी 104.4 फूट तर आजच्या दिवशी अवघे 83.3 फूट पाणी आहे.  त्यामुळे आजच्या घडीला पाणी अत्यंत जपून वापरणे अत्यंत गरजेचे बनले आहे. अन्यथा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. यासाठीच आठवड्यातून तीन दिवस पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकारी बिरंजे यांनी दिली. धरणात गाळ मोठ्या प्रमाणात जमा झाले आहे. त्याचबरोबर धरणाची उंची ही वाढविणे गरजेचे आहे. या प्रश्नांकडे वेळीच लक्ष दिले नाहीतर भविष्यात वाढते सपाटीकरण व काँक्रीटीकरण याचा परिणाम होऊन भीषण पाणीटंचाईचा सामना उरणकरांना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply