Breaking News

भारताला जो हरवेल तोच वर्ल्ड कप जिंकेल! ; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे विधान

लंडन : वृत्तसंस्था

विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या धडाकेबाज कामगिरीनंतर अनेक माजी दिग्गजांनी भारतच विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. पाकिस्तान, श्रीलंकेकडून झालेला धक्कादायक पराभव आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने मात दिल्यापासून इंग्लंडच्या माजी खेळाडूंचे सूरदेखील सोशल मीडियावर बदललेले पहायला मिळत आहेत.

आतापर्यंत इंग्लंडच विजयाचा प्रबळ दावेदार आहे आणि घरच्या मैदानावर विश्वचषक असल्याने परिस्थितीचा फायदा उचलत यजमान विश्वचषक जिंकतील अशा फुशारक्या मारणारे खुद्द इंग्लंडचेच माजी खेळाडू आणि कर्णधार आता भारतीय संघ विश्वचषक जिंकू शकतो, असे म्हणू लागले आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने तर यापुढे जात एक विधान केले आहे. भारत विश्वचषक जिंकू शकतो असे थेट म्हणणे वॉनने टाळले, पण ‘जो संघ भारताला पराभूत करेल तोच संघ हा वर्ल्डकप जिंकेल’, असे त्याने ठामपणे म्हटले आहे.

भारतीय संघ वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवेल हे निश्चित झाले त्याचवेळेस वॉन याने भारतीय संघाला जो संघ पराभूत करेल तोच विश्वचषक जिंकेल आणि या मताशी ठाम आहे असे विधान ट्विटरद्वारे केले. ट्विटरद्वारे सातत्याने वॉन भारतीय संघावर आणि संघातील खेळाडूंवर निशाणा साधत असतो किंवा टीका करतो. त्यामुळे त्याने केलेल्या या ट्विटनंतर सोशल मीडिया युजर्सकडून त्याची फिरकी घेतली जात आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply