Tuesday , March 21 2023
Breaking News

अलिबाग, नागाव किनारे तेल तवंगाने काळवंडले

अलिबाग : प्रतिनिधी

खवळलेल्या समुद्राच्या लाटांबरोबर तेलाचा तवंग मोठ्या प्रमाणावर किनार्‍यावर येत असल्याने सध्या अलिबाग व नागाव हे सुंदर किनारे काळवंडले आहेत. तेलामुळे किनारे चिकटही झाले असून, त्याचा त्रास पर्यटकांना सहन करावा लागतोय. तेल तवंगामुळे परिसर निसरडा होऊन लोक पाय घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

खोल समुद्रात मालवाहू जहाजे इंधन तेल सोडतात. हे तेल लाटांबरोबर किनार्‍यावर येते व वाळूत मिसळते. त्याचे गोळे तयार झाल्याने सध्या अलिबाग किनार्‍यावरून चालणे मुश्कील बनले आहे. इतर कचराही किनार्‍यावर आला आहे. याबद्दल स्थानिकांबरोबरच पर्यटकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तेलाचा तवंग व कचरा दूर करून किनारे स्वच्छ करावेत, अशी मागणी होत आहे.

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply