Breaking News

500 वारकर्यांची आरोग्य तपासणी ; कर्जत मेडिकल असोसिएशनकडून सुश्रुषा

कर्जत : बातमीदार

आषाढी वारीमध्ये विठूरायाचा नामघोष करीत असंख्य वारकरी देहभान विसरून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. या वारकर्‍यांची सेवा करण्याचा स्तुत्य उपक्रम कर्जत मेडिकल असोसिएशनने राबविला. असोसिएशनच्या सदस्यांनी वारीतील सुमारे 500 वारकर्‍यांची आरोग्य तपासणी करून भक्ती व बांधिलकीचे अनोखे दर्शन घडविले आहे.

कर्जत मेडिकल असोसिएशनचे एक पथक अध्यक्ष डॉ. गणेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीत सहभागी वारकर्‍यांची सेवा करण्यासाठी सासवड येथे गेले होते. तेथे त्यांनी शनिवारी (दि. 29) सकाळी 6 ते रात्री 7 वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबिर घेतले. यासाठी कर्जत मेडिकल स्टोअर असोसिएशनने औषधसाठा पुरविला होता. दिंडी क्रमांक 10चे संयोजक विनोद निंबाळकर यांनी या सेवेत सहकार्य केले. यापुढे आळंदी येथून माऊलींची पालखी निघेल तिथपासून वारकर्‍यांना आरोग्यसेवा द्यावी, असे आवाहन निंबाळकर यांनी केले.

या वेळी कर्जत मेडिकल असोसिएशनचे डॉ. संदीप माने, डॉ. निलेश म्हात्रे यांनी 500हून अधिक वारकर्‍यांची तपासणी केली. केमिस्ट शेखर बोराडे, नम्रता साळुंखे, विवेक दहिवलीकर यांनीदेखील दिवसभर वारकर्‍यांना सेवा देण्याचे काम केले. या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply