Breaking News

हे तटकरे माझ्यासमोर काय टिकाव धरणार -अनंत गीते

माणगांव : प्रतिनिधी

पराभव समोर दिसू लागल्याने राष्ट्रवादी काँगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूकीतून पळ काढला, तिथे हे तटकरे माझ्यासमोर काय टिकाव धरणार, अशी घणाघाती टिका महायुतीचे उमेदवार अंनत गिते यांनी बुधवारी (दि. 3) होडगांव कोंड येथील जाहीर प्रचार सभेत केली.

माणगांव तालुक्यातील होडगांव कोंड येथे महायुतीचे उमेदवार अंनत गिते यांच्या प्रचारार्थ बुधवारी सकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी गिते यांनी राष्ट्रवादी काँगे्रस बरोबरच सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आमदार भरत गोगावले, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवि मुंढे, राजीव साबळे, संघटक अरुण चाळके, पं.स. सभापती सुजित शिंदे, माजी सभापती राजेश पानवकर, महेंद्र तेटगुरे, रोहा तालुका प्रमुख समिर शेडगे, संपर्क प्रमुख बळीराम घाग, भाजपचे नाना महाले, प्राजक्ता शुक्ला, नितीन पवार, सुधिर पवार, प्रसाद गुरव, संजय घोसाळकर, प्रताप घोसाळकर, रविंद्र टेंबे, मिलींद फोंडके, सुदर्शन कदम, राजू पालकर, प्रकाश टेंबे, अच्युत तोंडलेकर, प्रभाकर ढेपे, अरुणा वाघमारे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ या प्रचारसभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत गांगवलीचे माजी उपसरपंच चंद्रकांत धाडवे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तसेच या सभेत नवनियुक्त पदाधिकार्‍यांना अनंत गीते यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.

रायगड मतदार संघातील ही निवडणूक म्हणजे सदाचार विरुध्द भ्रष्टाचार अशी लढाई आहे. माझ्या विरोधात तीन पक्षांनी आघाडी केली आहे. या आघाडीच्या रुपाने तीन भ्रष्टाचारी नेते एकत्र आल्याने माझा विजय अधिक सोपा झाला आहे.  असे अनंत गीते यांनी सांगितले.

रत्नागिरी बरोबरच रायगड मतदार संघातील जनतेने मला मनापासून स्वीकारले आहे. रायगडची जनता व रायगडचे मतदार माझया बरोबर असल्याने यावेळेसही मी विक्रमी मतानी जिंकणार आहे, असा विश्वास गीते यांनी यावेळी व्यक्त केला.

– अनंत गीते यांना मताधिक्य देणार

काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची दिग्गज मंडळी मैदान सोडून बाहेर पडत आहेत. मागच्या 2014 च्या लोकसभा निवडणूकीत तटकरेंचे कपडे फाडायला निघालेले जयंत पाटील आज तटकरेंचे कपडे शिवायला निघालेत. ते पाटील तटकरेंचे कपडे निट शिवतील का, हा एक सवाल आहे. तुमची नियत व नितीमत्ता चांगली असेल तर तुम्हाला कोणाही हरवू शकत नाही.  मतदार संघातून  यावेळेस 25 हजारांचा मताधिक्य देवू असे आमदार  गोगावलेे यांनी सांगितले.

– महायुतीला अनूकूल वातावरण

महायुतीला देशात व राज्यात अनूकूल असे वातावरण आहे. रायगडात तटकरेंच्या घराणेशाहीला व विश्वासघातकीपणाला  सारे कंटाळले असल्याने गीते साहेबांचा विजय निश्चीत आहे. या भागातून गीते साहेबांना किमान 2500 मतांची आघाडी आपण सर्वांनी देवू या, असे राजीव साबळे साबळे यांनी सांगितले.

तटकरे जलसंपदा मंत्री असताना 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा झाला आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून एक दिवस त्यांना नक्कीच जेलची हवा खावी लागणार आहे.  शेतकर्‍यांच्या आत्महत्तेला काँगे्रस आघाडीच कारणीभ्ाूत आहे.
-अनंत गीते, उमेदवार,
रायगड लोकसभा मतदार संघ

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply