Breaking News

पनवेल, उरणमध्ये वृक्ष लागवड ; वृक्ष लावा व संवर्धन करा -सायली म्हात्रे

उरण ः वातार्हर

वृक्षवल्ली आम्हा सोयरे, असे  संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. त्याप्रमाणे सर्वांनी वृक्ष लावले पाहिजेत, फक्त वृक्ष लागवड करून चालणार नाही, त्या वृक्षांचे संवर्धन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आज कृषी दिनानिमित्त आपण सर्वांनी झाडे लावू या व त्यांचे संवर्धन करू या, असे प्रतिपादन उरण पालिकेच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी केले. कृषी दिनाचे औचित्य साधून उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे व नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि. 1) रोजी उरण नगर परिषदेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी उरण नगर परिषद नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, इन्टर्नल ऑडिटर रूपाली देवकर, कर्मचारी संतोष पवार, सतीश धोत्रे, सचिन नांदगावकर व कर्मचारी आदी उपस्थित होते. सर्वांनी वृक्षरोपण करून वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply