Monday , January 30 2023
Breaking News

एमआयडीसीच्या भूसंपादन प्रक्रियेला शेतकर्यांचा विरोध

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड परिसरात प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला स्थानिक शेतकर्‍यांनी हरकत घेतली आहे. शेकडो शेतकर्‍यांनी शनिवारी (दि. 30) अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार यांची भेट घेऊन आपले आक्षेप नोंदवले.

आमचा भूसंपादनाला विरोध नाही, मात्र जमिनींना योग्य भाव मिळावा, स्थावर मालमत्तांचे बाजारमूल्य योग्य पद्धतीने करावे, स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना येथे येणार्‍या उद्योगांत नोकर्‍या मिळाव्यात, योग्य पुनर्वसन व्हावे, रासायनिक प्रदूषणकारी उद्योग उभारू नयेत, अशा मागण्या शेतकर्‍यांनी केल्या आहेत. 

अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागात मोठे शहापूर, धेरंड, धाकटे शहापूर, पेझारी, कमळपाडा, धामणपाडा, धसवड या भागातील 736.319 हेक्टर जमीन संपादित केली जात आहे. यात एकूण एक हजार 712

सर्व्हे नंबरमधील जवळपास 15 हजार शेतकरी बाधित होत आहेत. यातील बरेच शेतकरी हरकती नोंदवण्यासाठी हजर होते. हरकती नोंदवल्यानंतर या शेतकर्‍यांनी प्रांताधिकारी शारदा पोवार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले. प्रांताधिकार्‍यांनी शेतकर्‍यांचे सर्व आक्षेप नोंदवून घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन शेतकर्‍यांना दिले. प्रकाश धुमाळ व अ‍ॅड. मनोज धुमाळ यांनी शेतकर्‍यांचे नेतृत्व केले.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply