Breaking News

सीईटीपीचे पाणी कासाडी नदीत; आरोग्य धोक्यात

पनवेल ः वार्ताहर

गेले दोन दिवस म्हणजे 48 तास सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे तळोजा एमआयडीसीमधील सीईटीपी सतत 48 पडणार्‍या मुसळधार पावसामुळे तुडूंब भरून बाहेर वाहू लागली आहे. त्यामुळे   टँकमधील पाणी थेट रस्त्यावरील चेंबरमधून सरळ कासाडी नदीच्या पात्रात जात आहे. सीईटीपीच्या टँककमधील पाणी थेट कासाडी नदीत पोचल्याने माशांना धोका पोचणार आहे.

गेल्या दोन वर्षापासून प्रदूषणाच्या मुद्द्यामुळे तळोजा सीईटीपी नेहमी चर्चेत राहिली आहे. हरित लवादाच्या आदेशानंतर तरी सीईटीपीचा कारभार सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु ही अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे. कारण दोन दिवस पडणार्‍या मुसळधार पावसामुळे तळोजा सीईटीपी ओव्हर फ्लो झाल्यानंतर टँकमधील पाणी रस्त्यावरील चेंबरमधून कासाडी नदीच्या पात्रात जात आहे. सीईटीपीचे कोणतेही नियोजन नसल्याने प्रक्रिया न केलेले पाणी नदी पात्रात जात असल्याने ही बाब समोर आली आहे. स्वतः नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी सीईटीपीला जाऊन त्या ठिकाणची वस्तुस्थिती पाहिल्यानंतर याबाबत संताप व्यक्त केला आहे.

सीईटीपीचा हा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.सीईटीपीकडे एमआयडीसी, प्रदूषण मंडळाचेही दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply