पनवेल : रामप्रहर वृत्त – रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल रीटघर शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी पार पडला. 2005 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शाळेचे माजी विद्यार्थी जयदास यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. तब्बल 14 वर्षांनी शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्याने शाळेतील आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.
सध्याच्या धावपळीच्या काळात व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे सर्व जण एकत्र आले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन मेळाव्याचे आयोजन केले. यावेळी एकमेकांना तुळशीची रोपे देऊन या मेळाव्यात स्वागत करण्यात आले. सर्वांनी एकत्रित येऊन रमाकांत अरिवले व महेश चौधरी या दिवंगत माजी सहकार्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील अनुभव, वर्तमान स्थितीबद्दल चर्चा केली, तसेच सर्वांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करणार्या सपना फडके व जयदास भोपी यांना धन्यवाद दिले. या मेळाव्यात जयदीप खारटकर, जितेश भोपी, राजेश सिनारे, जयवंत चौधरी, प्रभाकर काठावले, विशाल म्हात्रे, नागेश वास्कर, संतोष वास्कर, नितीन भोपी, पूनम पांडव, मनोज भगत, रूपेश नावडेकर, अपर्णा पाटील, नरेश पाटील, नितेश पाटील, विठ्ठल पाटील, रोशन भोपी, किरण भोपी, जयेश चौधरी, रेश्मा पाटील, योगेश पवार, नासीर शेख, संदेश पाटील, रूपेश चौधरी, विलास सिनारे आदी माजी विद्यार्थी यावेळी एकत्र आले होते.