Breaking News

दि. बा. पाटील यांच्या नावाचा राज्य सरकारने विचार करावा

ना. कपिल पाटील यांचे भूमिपुत्रांना समर्थन

ठाणे ः प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी (दि. 16) ठाण्यातून प्रारंभ झाला. या वेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या मागणीचे समर्थन केले. ‘दिबां’चे नाव देण्याची मागणी केवळ माझी नाही तर तमाम भूमिपुत्रांची आहे. याबाबत राज्य सरकारने विचार करावा, असे म्हटले.
भाजपने जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. या अंतर्गत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी ठाणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. या यात्रेत भाजप नेते, पदाधिकारी सहभागी झाले होते. रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हेही या वेळी उपस्थित होते.
‘ज्यांच्यामुळे तुम्ही मंत्रिपदी पोहचलात त्यांचे आशीर्वाद प्रथम घ्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. म्हणूनच जनतेचा आशीर्वाद घेऊन जाण्यासाठी आम्ही आलो आहोत,’ असे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही काम करीत आहोत. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रात मंत्रिपद मिळाले आहे. 2014पर्यंत मी भरकटलेलो होतो, आता नेमकी दिशा सापडली आहे. मला दिलेली जबाबदारी ही ठाण्यापुरती
नाही, तर संपूर्ण देशात काम करायचे आहे, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
ठाण्याचा वनवास संपला!
जनआशीर्वाद यात्रेच्या सुरुवातीला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. प्रभू रामाचा वनवास 14 वर्षांनी संपला होता. ठाण्याचा वनवास 74 वर्षांनी संपला. पंतप्रधान मोदींनी मला मंत्रिपद दिले. मोदी है तो मुमकीन है, असे मंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply