Breaking News

ठाकूर विधी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात मूट कोर्ट स्पर्धा, ड्राफ्टींग स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, उत्कृष्ट विद्यार्थी शिक्षक, रांगोळी, मेहंदी, चित्रकला, पोस्टर बनविणे, फूड फेस्ट, रास गरबा, क्रीडा प्रतियोगिता अशा नानाविध स्पर्धा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या तसेच पाच आणि तीन वर्षीय अभ्यासक्रमाच्या प्रत्येक वर्षात प्रथम क्रमांक मिळविलेले विद्यार्थी तसेच विधी अभ्यासक्रमाच्या सर्व सत्रांच्या परीक्षा प्रथम प्रयत्नात उतीर्ण, महाविद्यालयाच्या शैक्षणिक तसेच शिक्षणेतर कार्यक्रमात सहभाग, शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांशी वर्तणूक, महाविद्यालयातील उपस्थिती, अशा अनेक निकषांवर पात्र होणार्‍या, विद्यार्थ्यास सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार, अशा गुणवान विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ, त्याचप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण करून या वर्षी महाविद्यालयाचा निरोप घेणार्‍या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना नुकताच एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाला मुंबई येथील लाला लाजपतराय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता कर्वे या मुख्य अतिथी म्हणून तर व्हीब फाउंडेशनच्या संचालिका अर्चना परेश ठाकूर आणि पनवेल टाईम्सचे संपादक गणेश कोळी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यानंतर टाळ्यांच्या गजरात देवी सरस्वती, विधी महाविद्यालयाचे स्फूर्तीस्थान स्व. भागूबाई चांगू ठाकूर आणि स्व. जनार्दन भगत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात झाली. विशेष अतिथी अर्चना परेश ठाकूर आणि गणेश कोळी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि अभ्यासक्रम पूर्ण करून महाविद्यालयाचा निरोप घेणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली. यशश्री म्हात्रे आणि मृण्मयी खांबेटे या विद्यार्थिनींची अनुक्रमे पाच आणि तीनवर्षीय अभ्यासक्रमाच्या अंतीम वर्षातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून निवड करण्यात आली.  या वेळी बिसीटी किंग आणि बिसीटी क्वीन ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अतुल येंडारकर यास बिसीटी किंग आणि कृतांजली म्हात्रे हिला बिसीटी क्वीन म्हणून निवडण्यात आले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि सर्व कार्यकारिणी सदस्य, प्राचार्या डॉ. शितला गावंड तसेच सहाय्यक शिक्षिका संध्या बालाकृष्णन, सरिता समेळ आणि दीपाली बाबर आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply