Breaking News

दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या!

मुंबई ः प्रतिनिधी

कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एमपीएससीची 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्याबाबत मागणी केली जात होती. अखेर या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर या संदर्भात माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा नेमक्या किती तारखेला घेणार याविषयी राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही, मात्र दहावीची परीक्षा जून महिन्यात, तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होईल. त्या अनुषंगाने नियोजन करून परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील, असे गायकवाड यांनी सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दहावी आणि बारावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातला महत्त्वाचा टप्पा आहे. आधीच अभ्यासाचा तणाव आणि त्यात रुग्णांची वाढणारी संख्या, हा चिंतेचा विषय होता. या परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची, हा मोठा प्रश्न होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमच्यासाठी प्राथमिकता आहे, असेदेखील वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्या, तरी सीबीएसईसारख्या इतर बोर्डाचे काय? असा देखील प्रश्न आहे. त्यावर बोलताना शिक्षणमंत्री म्हणाल्या, महाराष्ट्र बोर्डाव्यतिरिक्त इतर जे बोर्ड आहेत, त्यांनादेखील राज्य सरकारच्या निर्णयावर अंमलबजावणी करावी, अशी विनंती आम्ही करणार आहोत.

आशिष शेलार यांच्या मागणीची दखल

राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता दहावी, बारावीची परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी राज्याचे माजी शिक्षणमंत्री भाजप आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत अखेर दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला आहे. शेलार यांनी म्हटले होते की, कोविडची सध्याची भयावह स्थिती पाहता विद्याथ्यारच्या आरोग्याची प्रथम काळजी घेणे आवश्यक आहे, तसेच सरकारने विद्याथ्यारचे शैक्षणिक आरोग्याची सुध्दा काळजी करणे आवश्यक आहे. त्यामुळे सद्य:स्थितीमध्ये परीक्षांच्या नियोजित तारखा पुढे ढकलण्यात याव्यात, तसेच कोविडची परिस्थिती आटोक्यात येताच योग्य वेळी दोन्ही पद्धतीने परिक्षा घ्याव्यात.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply