Breaking News

ग्रामीण भागात वारंवार बत्ती गुल

पनवेलः बातमीदार

जून महिन्यापासून पनवेल परिसरात विजेचा लपंडाव पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात तर कित्येक तास वीज गायब होत आहे. सोमवारी (दि. 1) सकाळपासून ग्रामीण भागातील वीज गायब झाली होती. महावितरणचा भोंगळ कारभार यामुळे समोर आला आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.  शुक्रवार (दि. 28) पासून दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे. मात्र दर दिवशी ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होत आहे. जुनाट केबल, सडलेले विजेचे खांब, उघड्या डीपी यामुळे वीज जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सततच्या विजेच्या जाण्यामुळे वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस देखील वीजपुरवठा खंडित होत असल्याने मच्छरांचा उपद्रव जाणवू लागला आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्री या चारही वेळेला वीज गायब होत असल्याने नक्की वीज कोणत्यावेळेला असते, असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत. वारंवार वीज गायब होत असली तरीदेखील वीजबिल कमी होण्याचे नाव घेत नाही. पनवेल तालुक्यात लाखो ग्राहक आहेत. मात्र त्यांना विजेचा लपंडाव सहन करावा लागत आहे.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply