Breaking News

मुरूडमध्ये पोलिसांची आरोग्य तपासणी

मुरुड : प्रतिनिधी  

डॉक्टर्स डे चे औचित्य साधून मुरुड आणि रायगड मेडिकल असोसिएशन आणि मेडिकल टेकनालॉजीस्ट याच्या संयुक्तवतीने सोमवारी येथील पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्‍यांची मोफत आरोग्य तपासणी

करण्यात आली.

वाढते ताणतणाव आणि कामाच्या अनिश्चित वेळा हा पोलिसांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसतात. म्हणूनच प्रत्येक पोलीस कर्मचार्‍याने आपल्या आरोग्याची तपासणी करणे काळाची गरज असल्याचे मत जंजिरा मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. मकबुल कोकाटे यांनी यावेळी व्यक्त केले. उपनिरीक्षक विजय गोडसे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलीस कर्मचार्‍यांच्या  रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण तसेच मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आदी तपासण्या करण्यात आल्या. यावेळी उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील सुमरादेवी व बेलीवाडी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना दप्तराचे मोफत वाटप करण्यात आले.सुमरादेवी येथील शाळेस वॉटर फिल्टर देण्याचे आश्वासन डॉ. मकबूल कोकाटे यांनी दिले.

डॉ. राज कल्याणी, डॉ. मंगेश पाटील, डॉ. मयुर कल्याणी, डॉ. अनंत जोशी, डॉ. वासिम  पेशमाम, डॉ. अमित बेनकर, डॉ. रवींद्र नामजोशी, डॉ. इप्सीत पाटील, डॉ. भाविका कल्याणी, डॉ. मेहविश बिरवाडकर, डॉ. नाहिला कोकाटे, डॉ. निस्सार बिरवाडकर, डॉ. एस. किर, डॉ. कल्बस्कर, पोलीस निरीक्षक किशोर साळे, उपनिरीक्षक विजय गोडसे, उसरोलीचे सरपंच मनीष नांदगावकर, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष मुश्ताक हंसवारे यांच्यासह पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply