Breaking News

अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेची कारवाई

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल येथील बंदर रोड येथे अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त  सुवर्णा दखणे, प्रभाग अधिकारी अरविंद पाटील, कनिष्ठ अभियंता वैभव घरत, अतिक्रमण पथक प्रमुख व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

पनवेलमधील बंदर रोडवरील गाळेधारकांनी अनधिकृतरित्या पोटमाळे तयार केले होते. ब्रेकर, गॅस् कटरच्या साहाय्याने ही तोडक कारवाई करण्यात आली. आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सध्या पनवेल कार्यक्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग्जवर मोठी कारवाई सुरू आहे. तसेच अनधिकृत बांधकामांवरही हातोडा चालविला जात आहे. यापुढे असे अनधिकृत बांधकाम आढळल्यास त्यावरती महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात येणार आहे.

कोणतेही बांधकाम करताना महापालिकेची परवानगी घेऊनच बांधकाम करावे, असे आवाहन उपायुक्त कैलास गावडे यांनी केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply