कर्जत : बातमीदार
कर्जत-खोपोली या उपनगरीय रेल्वे मार्गावरील पुलाचे काम करण्यासाठी रविवारी (दि. 24) सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकडून खोपोलीला आणि खोपोलीकडून मुंबईला जाणारी प्रत्येकी एक फेरी कर्जत-खोपोली दरम्यान रद्द करण्यात आली आहे. त्याचवेळी या मार्गावर चालविण्यात येणार्या शटल सेवेच्या तीन फेर्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या मेनलाईनवरील कर्जत-खोपोली मार्गावर असलेल्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, त्या दरम्यान मुंबईवरून खोपोलीकरता सुटणारी लोकल कर्जत स्थानकात 9.21 मिनिटांनी रद्द करण्यात येईल, तर खोपोली-मुंबई सीएसएमटी लोकल खोपोली स्थानकात रद्द करण्यात येणार आहे.त्याशिवाय खोपोली आणि कर्जत दरम्यान चालविल्या जाणार्या लोकलच्या तीन फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात कर्जत येथून खोपोलीला जाणार्या 10.40, 11.55 आणि 1.15 या फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर खोपोलीयेथून कर्जतकडेयेणार्या लोकलच्या 10.00, 11.20 आणि 12.40 या तीन फेर्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र हा मेगाब्लॉक सुरू असताना कर्जत-मुंबई या मार्गावरील उपनगरीय सेवा सुरूच राहणार आहेत.