Breaking News

कर्जत तालुक्यात 8 थेट सरपंच आणि 59 सदस्यांसाठी आज मतदान

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींचे थेट सरपंच आणि सदस्य निवडीसाठी रविवारी (दि. 24) मतदान घेण्यात येत  आहे. या आठ ग्रामपंचायतीमधील एकूण 82 जागांपैकी 23 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने 59 सदस्य निवडण्यासाठी ही निवडणूक होत आहे. या आठ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच  20 तर सात ग्रामपंचायतीमधील 59 सदस्यांसाठी 126 उमेदवारांनी मतदारांना कौल लावला आहे.

कर्जत तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका रविवारी होत असून, त्यातील भालीवडी ग्रामपंचायतीमधील सर्व 11 सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत, मात्र तेथे नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव असलेल्या थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. तालुक्यातील हालीवली ग्रामपंचायतमधील 9 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या असून, तेथे आता थेट सरपंच आणि 3 सदस्य निवडण्यासाठी निवडणुक होणार आहे. पळसदरी ग्रामपंचायत मधील 9 पैकी 3 सदस्य बिनविरोध निवडले गेले असून आता तेथे थेट सरपंच आणि 6 सदस्य निवडण्यासाठी निवडणूक होणार आहे. किरवली, खांडपे, सावेळे या तीन ग्रामपंचायतीमधील एक सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

सर्व आठ ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. सरपंच पदासाठी भालीवडी-2, हालीवली-2, खांडपे-2 ममदापुर-2, चिंचवली-2, सावेळे-2 आणि पळसदरी-5 अशा 19 उमेदवारांच्यात लढत होणार आहे.

आठ ग्रामपंचायतीमध्ये 23 सदस्य बिनविरोध निवडले गेले असून, उर्वरित सात ग्रामपंचायतीमधील 59 जागांसाठी आता 126 उमेदवारांत लढत होत आहे. या आठ ग्रामपंचायतीमधील प्रचार संपला असून, रविवारी आठ ग्रामपंचायतीमधील 25  मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. भालीवडी ग्रामपंचायतीमधील सर्व 11 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने तेथे केवळ थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply