पेण : प्रतिनिधी
जेएसडब्ल्यू कंपनीच्या अलिबाग गेटच्या बाजूला धरमतर ब्रिजजवळ शुक्रवारी (दि. 22) सकाळी बोलोरो जीपने मोटार सायकलला ठोकर दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार व मागे बसलेला इसम असे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना पेण येथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे
बोलोरो जीप (एमएच-01, डीइ-1677) जेएसडब्ल्यू कंपनी येथून वडखळ – पोयनाड मार्गे जात होती. धरमतर ब्रिजजवळ समोरून आलेल्या मोटारसायकलला (एमएच-06, बीएस-828) जीपने धडक दिली. या अपघाताची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार घोलप करीत आहेत.