Breaking News

राजगड ते रायगड दौड

भिडे गुरुजींची प्रकृती अस्वस्थ, उपचारानंतर पुन्हा दौड सुरुच

महाड : प्रतिनिधी

शिवप्रतिष्ठान आयोजित  किल्ले राजगड ते दुर्गराज रायगड अशा भव्य पायी दौड दरम्यान मढेघाट मार्गे दहिवड या गावी आल्यानंतर भिडे गुरुजी यांची प्रकृती बिघडली. त्यांना रात्री महाड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुसर्‍या दिवशी पुन्हा गुरुजी शिवभक्तांसोबत दौडमध्ये सहभागी झाले. रविवारी (दि. 24) रायगडावर लाखो शिवभक्तांच्या उपस्थित या दौडची समाप्ती होणार आहे.

तरुणांनमध्ये शिवभक्ती आणि दुर्ग प्रेम जागृत करण्यासाठी संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली श्री शिवप्रतिष्ठाच्या वतीने दरवर्षी दुर्ग दौडचे आयोजन करण्यात येते. या पायी दौडमध्ये हजारों शिभक्तांच्या सोबत भिडे गुरुजीही सहभागी होतात. यावेळी 22 फेब्रुवारी रोजी किल्ले राजगड ते दुर्गराज रायगड पायी दौडला  सुरुवात करण्यात आली. किल्ले राजगड, वेल्हे, केळद, मढेघाट मार्गे वाकी, वाळण, वारंगी पुढे रायगड अशी ही दौड होत आहे.  शुक्रवारी सायंकाळी मढे घाट उतरुन ही दौड वाकी गावात आली असताना भिडे गुरुजींची प्रकृती बिघडली. त्यांना त्वरीत महाड ग्रामीण रुग्णालय त्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. आदित्य महामणकर यांनी गुरुजींवर उपचार सुरू केले. या वेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पीटल परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शनिवारी सकाळी गुरुजी पुन्हा या दौडमध्ये सहभागी झाले.  रविवारी सकाळी स्वतः सभांजी भिडे गुरुजी शिवभक्तांना मार्गदर्शन करणार आहेत.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply