Breaking News

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस अटक

महाड ः प्रतिनिधी

महाड तालुक्यात गोमेंडी या दुर्गम गावातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. सर्वत्र महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच महाड तालुक्यात सोमवारी (दि. 19) एका लिंगपिसाट नराधमाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र येथील जागरूक ग्रामस्थांनी वेळीच धाव घेऊन पीडित मुलीची सुटका करून आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

महाड तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 10.30 वाजता गोमेंडी गावातील 12 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेली होती. दरम्यान, हुसेन इब्राहिम ठोकणे (34, रा. चिंभावे मोहल्ला) याने तिला एकटीच पाहता विनयभंग करीत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुलीच्या आईने महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीविरोधात भा. दं. वि. कलम 354, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012चे कलम 8अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याची 15 दिवसांसाठी अलिबाग कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक गवारे अधिक तपास करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply