Saturday , March 25 2023
Breaking News

चिवे शाळेत कबड्डी प्रशिक्षण शिबिर

सुधागड : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात कबड्डीची मोठी परंपरा आहे. याला अनुसरून सुधागड तालुक्यातील चिवे आश्रमशाळेत आरंभ प्रतिष्ठान ठाणे यांच्या सौजन्याने व श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळ भायखळा मुंबई यांच्या सहकार्याने कबड्डी शिबिर घेण्यात आले.

या वेळी प्रशिक्षक प्रवीण शिंदे व व अपर्णा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना कबड्डीचे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण दिले. यात 42 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

आरंभ प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कांचना जाधव यांनी इयत्ता दहावीच्या 30 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके भेट दिली व जागतिक कृषी दिनानिमित्त शाळा परिसरात 20 झाडे लावली.

कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक पिंगळे, श्री. गुरव, शिक्षक श्री. खोपडे, डबीर आदी उपस्थित होते. त्यांनी जाधव व सहकार्‍यांचे आभार मानले, तसेच भविष्यात असेच सहकार्य करावे, अशी विनंतीही केली.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply