Tuesday , March 28 2023
Breaking News

ऑस्ट्रेलिया संघाला दोन धक्के ; एक फलंदाज हॉस्पिटलमध्ये, तर दुसरा स्पर्धेबाहेर

लंडन : वृत्तसंस्था

वर्ल्ड कप स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा  संघ अव्वल स्थानावर विराजमान असून, अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवून हे स्थान कायम राखण्याचा त्यांचा निर्धार आहे, पण उपांत्य फेरीत तगड्या संघाचा सामना करण्यापूर्वीच ऑसी संघाला दोन मोठे धक्के बसले आहे. पाच वेळा वर्ल्ड कप उंचावणारा ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत खेळण्यापूर्वी त्यांच्या दोन तगड्या फलंदाजांना दुखापतीने ग्रासले आहे. त्यामुळे एकाला हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागली, तर दुसर्‍याने स्पर्धेतून माघार घेतली.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज शॉन मार्शला वर्ल्ड कप

स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली आहे. सराव सत्रात त्याच्या मनगटाला दुखापत झाली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याच्यासह अष्पपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यालाही सराव सत्रात दुखापत झाली. मार्शच्या मनगटाला झालेली दुखापत गंभीर असून, त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. मॅक्सवेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असला तरी त्याच्या दुखापतीबद्दल अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. शॉन मार्शने माघार घेतल्यानंतर त्याला बदली खेळाडू म्हणून पीटर हँड्सकोम्बला बोलवण्यात आले आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती दौर्‍यात हँड्सकोम्बने मधल्या फळीत दमदार कामगिरी केली होती.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply