पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतीय जनता पार्टी आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असतात. त्या अंतर्गत गव्हाण, न्हावा, न्हवाखाडी, शिवाजीनगर, रा.जि.प शाळा बामणडोंगरी, पनवेल तालुक्यातील पेठाली, तळोजे मजकूर, तुर्भे, पिसार्वे येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप कायक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना वह्यावाटप केले.
भारतीय जनता पार्टी आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने न्हावा, न्हावा खाडी, शिवाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि गव्हाणमधील जिल्हा परिषद शाळा, कन्या शाळेत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. या वेळी भाजपचे कोळी समाज अध्यक्ष विश्वनाथ कोळी, हरिचंद्र म्हात्रे, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत ठाकूर, न्हावा ग्रामपंचायत सदस्य सागरशेठ ठाकूर, मीनाक्षीताई पाटील, माजी नगरसेविका कमलाताई म्हात्रे, रंजना पाटील, रंजना घरत, अरुणा म्हात्रे, सुशिला पाटील, अनिल कोळी, उलवे नोड 2 अध्यक्ष सी. एल. ठाकूर, सागर ठाकूर, प्रकाश कडू, गोपीचंद ठाकूर, श्रीधर मोकल, हरेश्वर कडू, नरेश मोकल, जनार्दन ठाकूर, विजय ठाकूर, सदाशिव ठाकूर, अनुजा मोकल, साधना ठाकूर, सुगंधा ठाकूर, संजय कसबे, कल्पनाताई ठाकूर, व्ही. के ठाकूर, टी. के. ठाकूर, सी. एल. ठाकूर, विजय कडू, गव्हाण सरपंच हेमलता भगत, स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन अनंता ठाकूर, वामन म्हात्रे, काशीनाथ पाटील, सतीश घरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे पनवेल तालुक्यातील पेठाली, तळोजे मजकूर, तुर्भे, पिसार्वे येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, संतोष पाटील, निर्दोष केणी, दिलीप केणी, डॉ. सतीश भोईर, भास्कर तरे, गणपत पाटील, रेवन दवने, वसंत भोईर, बिंदास तरे, राजेश महादे, संजय म्हात्रे, आशीष महादे, माजी सरपंच प्रकाश म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. रा.जि.प शाळा बामणडोंगरी येथे ग्रा.पं. वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, उलवे नोड भाजप अध्यक्ष मदन पाटील, ग्रा.पं. सदस्या गीता ठाकूर, मंजुळा कोळी, चेतन घरत, दीपक गोंधळी, मनोज नाईक, पदाजी नाईक, नंदकुमार ठाकूर आदी उपस्थित होते.