म्हसळा ः प्रतिनिधी
सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने 21 ते 25 मार्च रोजी गुजरातमध्ये होणार्या ज्युनिअर राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील आरुष नित्तूरे आणि अश्विन प्रभू यांची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या राज्य निवड चाचणी स्पर्धेतून दोघांची निवड झाल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल रायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्ष तथा पनवेल मनपा नगरसेविका सीता पाटील, सचिव स्वप्नील वारंगे, खजिनदार हेमंत पयेर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी आरुष आणि अश्विन यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …