Breaking News

श्री सदस्यांकडून पेणमध्ये 27 हजार रोपांची लागवड

पेण ः प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने तसेच महाराष्ट्राचे स्वछतादूत पद्मभूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने रविवारी (दि. 7) पेण येथील श्री सदस्यांनी 27 हजार वृक्षांची लागवड तालुक्यातील  पिंपळगाव, सापोली येथे केली. यावेळी पेण वनक्षेत्रपाल व वन कर्मचारी उपस्थित होते.

तालुक्यातील पिंपळगाव, सापोली येथे आज वनखात्याच्या 25 हेक्टर जागेत 27 हजार 775 वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये शिवण, आपटा, खैर, शिसव, तुती, करंज, आवळा, कांचन, साग, बांबू, काजू, बावळा, या वृक्षांचा समावेश आहे. सकाळपासून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये पेण तालुक्यातील वाशी नाका, वाशी, रावे, वरवणे, वरसई, सापोली, धावटे, आंबिवली, जिते, हनुमान पाडा, दादर, शिर्की, वडखळ, भाल व पेण शहर या सोळा बैठकांतील 1090  श्री सदस्यांनी सहभाग घेतला. याच वृक्ष लागवड योजनेअंतर्गत पेण तालुक्यातील श्री सदस्यांनी 2017मध्ये हनुमानपाडा, 2018मध्ये खारपाडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये वृक्षारोपण केले आहे. या बरोबरच पेण उंबर्डे येथे वनविभागाच्या साडेसात एकर जागेतदेखील वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन करण्याचे काम पेण येथील श्री सदस्य करीत आहेत.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply