पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल डॉक्टर प्रक्टिशनर असोसिएशनच्या वतीने अजिवली ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या परवानगीने अजीवली येथील शनिमंदिराच्या मागील डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.
पनवेल तालुक्यातील अजिवली येथे वृक्षारोपण करण्यात आले. बाबुल, सीताफळ, पेरू, आंबा या झाडांची लागवड करण्यात आली. वृक्ष संवर्धनाची जबाबदारी ग्रामपंचायतने घेतली, तसेच पनवेल डॉक्टर प्रक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल, सचिव डॉ. प्रकाश पाटील यांचे आभार मानले. या लागवडीसाठी प्रमुख पाहुणे हे आडीबीआय बँकेचे मॅनेजर मनीष पाठक व हांडे हॉस्पिटलचे संचालक डॉ. हांडे हे उपस्थित होते, तसेच डॉ. राऊत, डॉ. अमृतकर, डॉ. यासिन, डॉ. जोशी, डॉ. भोईर, डॉ. सागर ठाकूर, डॉ. सागर चैधरी, डॉ. बहाडकर, डॉ. मेटकर, डॉ. सांळुखे, डॉ. वैभव पाटील, डॉ. सिद्धार्थ, डॉ. अरुणेश, डॉ. संकेत, डॉ. सचिन, डॉ. प्रशांत, डॉ. योगेश, डॉ. किशोर, डॉ. कंकण, डॉ. स्वप्नील, डॉ. आशीष, डॉ. रवी, महिला डॉक्टर डॉ. भोईर, डॉ. ठाकूर, डॉ. सोनल यांची उपस्थिती लाभली. यावेळी डॉक्टर वैभव मोकल आणि कोन सरपंच नीलेश म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.