Breaking News

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेत वह्यावाटप

खारघर : प्रतिनिधी  – परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय नावडे या ठिकाणी 1992-1993 मध्ये दहावी इयत्तेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आपल्या शाळेविषयी आपुलकी दाखवत शाळेतील विद्यार्थ्यांना शनिवारी (दि. 6) कार्यक्रमाचे आयोजन करून मोफत वह्यावाटप केले. यावेळी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नव्वदच्या दरम्यान पनवेल तालुक्यात मोजक्याच शाळा होत्या. यावेळी नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे विद्यालयात पंचक्रोशीतील गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. याठिकाणी शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. चाळीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येण्यासाठी वह्यावाटपाचा कार्यक्रम आखला. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत आपले काही तरी देणे लागते या उदात्त हेतूने या माजी विद्यार्थ्यांनी आपली आपुलकी या कार्यक्रमाद्वारे व्यक्त केली. सोमनाथ पाटील, पुष्पा मोकल, कविता गावंड यांच्या पुढाकाराने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. जवळ जवळ 50 ते 60 माजी विद्यार्थी यावेळी हजर होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply