Breaking News

ताडपत्री खरेदी करण्याची लगबग

उरण ः वार्ताहर – उरण तालुक्यातील दुर्गम भागात आदिवासी समाज मोठ्या संखेने वास्तव करीत असल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी आणि घरांची  दुरुस्ती करण्याची लगबग सुरू झाली आहे. खेड्यातील काही घरांवर, गोठ्यासाठी, खिडकीच्या लाकडांसाठी, वाहन, पडवी आदी ठिकाणी प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीची गरज असते. त्यामुळे उरण बाजारपेठेत ताडपत्री खरेदी करताना नागरिक दिसत आहेत.

गेल्या आठवड्यापासून पावसाने कहर केला असून पावसाच्या पाण्याने आपल्या घरातील वस्तूंचे जतन करण्यासाठी ताडपत्री किंवा प्लॅस्टिकचा सर्रास वापर करण्यासाठी नागरिक ताडपत्री खरेदी करीत आहेत. बाजारात विविध पन्हाचे निळ्या, पिवळ्या, किंवा पांढर्‍या रंगाचे प्लॅस्टिक बाजारात उपलब्ध आहेत. भरपावसात लावणी करताना याचा उपयोग होत असतो.

या परिसरातील नागरिक पावसाळ्यात घरात पाण्याची गळती होऊ नये म्हणून खूप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकची खरेदी करीत असतात, तसेच ताडपत्रीची विक्री होत आहे, असे कृणाल हार्डवेअर अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्सचे अनिल शाह यांनी सांगितले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply