Breaking News

शिकार्याच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू

अकोट ः प्रतिनिधी

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या सातपुड्याच्या जंगलात बिबट्याची शिकार करण्यासाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकल्याने बिबट्याचा मृत्यू झाला आहे. फासकीतून सुटका करून घेण्यासाठी धडपडत असताना बिबट्याने जीव गमावला. सातपुड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात बिबट्या, वाघ आणि इतर वन्यप्राणी आहेत. विविध कारणांमुळे बिबट्या, वाघ हे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नदी, नाले आणि गाववस्त्यांकडे धाव घेत आहेत. तेल्हारा तालुक्यातील खंडाळा गावालगत सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जमुना नदीमध्ये शिकार्‍यांनी बिबट्याच्या शिकारीसाठी फास लावला होता. त्यामध्ये बिबट्या अडकला. या फासातून सुटका करून घेण्यासाठी धडपड करत असताना बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याच्या मृत्यूबद्दल वन विभागाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. या घटनेमुळे बिबट्या, वाघाचे अधिवास क्षेत्र शिकार्‍यांना माहीत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बिबट्याचा मार्ग, त्या मार्गावरून येण्याची त्यांची वेळ याची अचूक माहिती शिकार्‍यांकडे असल्याचे याआधीही वारंवार अधोरेखित झाले होते. आतापर्यंत या भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply