Tuesday , March 21 2023
Breaking News

चौल चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात

रेवदंडा ः प्रतिनिधी

डिसेंबर 2018मध्ये चौल जाखमाता मंदिर परिसरातील चोरी प्रकरणातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात रेवदंडा पोलिसांना यश मिळाले. रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार  व्ही. के. सरके व पोलीस नाईक कल्पेश नलावडे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून आरोपीला जेरबंद केले. रेवदंडा पोलिसांनी तपास करून त्यावेळी  दोन अल्पवयीन मुले व 20 वर्षीय प्रिया आके्रश भोसले यांना ताब्यात घेतले व या प्रकरणातील मुख्य आरोपी व फरार आलेश उर्फ आक्रेश भोसले हाही सापडला आहे.

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply