Thursday , March 23 2023
Breaking News

करण माळी, प्रतीक्षा कुलथे रोहा वर्षा मॅरेथॉनमध्ये प्रथम

रोहे ः प्रतिनिधी

येथे आयोजित जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉनमध्ये खुल्या गटात पुरुषांमध्ये करण माळी आणि महिलांमध्ये प्रतीक्षा कुलथे यांनी बाजी मारली. या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होेते.

पुरुष खुला गटात करण हरिश्चंद्र माळी प्रथम, अक्षय जितेकर व्दितीय, रामू गणपत पारधी तृतीय, तर महिला खुला गटात प्रतीक्षा कुलथे प्रथम, ऋतुजा जयवंत सकपाळ व्दितीय, अमृता महादेव पाटील तृतीय आली, पाचवी ते सातवी गटात मुलांमध्ये आशिष विलास धसाडे प्रथम, अमर वारगुडे व्दितीय, अमोल वालेकर तृतीय, मुलींमध्ये सई महेंद्र पाखर प्रथम, दिशा उमेश निष्ठे व्दितीय, साक्षी हेमा वाघ तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. आठवी ते दहावी गटात मुलांमध्ये प्रफुल्ल ठमके प्रथम, महेंद्र वारगुडे व्दितीय, यश विकास चौगले तृतीय, मुलींमध्ये निकीता व्दिगविजय शर्मा प्रथम, कल्याणी शांताराम पाटील व्दितीय, तन्वी चंद्रकांत मनवे तृतीय आली. 40 ते 60 वयोगटात पुरुषांमध्ये सतिश रामदास म्हात्रे प्रथम, गोपीनाथ साळवी व्दितीय, चित्तरंजन अंबिका प्रसादसिंग तृतीय आणि महिलांमध्ये सविना रिचर्ड डॅनियल्स प्रथम, रेश्मा रत्नाकर भोसले व्दितीय व रिया राजेंद्र कासार यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. ज्येष्ठ नागरिक गाटत राजाराम गणपत कडू, सोपान पांडुरंग मोहिते व राजकुमार सखाराम मोहिते यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक प्राप्त केले. सर्व विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply