Tuesday , March 28 2023
Breaking News

काँग्रेसच्या प्रमोद केणे यांनीही हाती घेतले ‘कमळ’

उलवे नोड : रसायनी परिसरातील तुराडे येथील काँग्रेसचे कार्यकर्ते प्रमोद केणे यांनी त्यांच्या समर्थकांसह रविवारी (दि. 14) भाजपमध्ये प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष व पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा यांच्यासह सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी माळी, माजी सरपंच संतोष माळी, डॉ. अविनाश गाताडे, गुळसुंदे जि. प. अध्यक्ष प्रवीण खंडागळे, पं. स. विभागीय अध्यक्ष सुनील माळी, सीताराम माळी, तुराडे येथील माजी सरपंच गोविंद भोईर, युवा नेते निकेत ठाकूर, स्वप्नील ठाकूर, वामन गायकर, नीलेश केणी, राजेश केणी, मनीष केणी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply