पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्यांचा ओघ सातत्याने वाढत आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून पनवेल येथील लक्ष्मी वसाहतीमधील कर्नाटकी ऐक्य कामगार संघटनेच्या असंख्य पदाधिकारी व सदस्यांनी रविवारी
(दि. 14) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे आदी उपस्थित होते. या वेळी कर्नाटकी ऐक्य कामगार संघटनेच्या असंख्य पदाधिकारी व सदस्यांनी भाजपचे नेतृत्व स्वीकारले.
यांनी केला पक्षप्रवेश मिलिंद सत्वे, लखन जाधव, महेश आनुरकर, हसन बागवान, राजेंद्र कोळी, चनप्पा कुकनुर, अजगर पटेल, सत्तार पठाण, समीर कांजा, देवा सुतार, लाडू नदाफ, शिवशंकर सुतार, सोनू विश्वकर्मा, गणेश चफलिया, शाबुद्दीन बागवान, शौहरत अन्सारी, जावेद बागवान, गफार पठाण, पिरा प्रसाद, मन्सूर अन्सारी, जावेद अन्सारी, शौरत अन्सारी, सविता कोळी, तापराबी पठाण, विश्वकर्मा, दौसतबी पटेल, मिरा विश्वकर्मा, शाईन हुसेन सय्यद, मेहबूब सय्यद, नसिम पटेल, साधना गुप्ता, समीना पटेल, गीता कांजा, दौलबी नदाफ, मल्लमा सुतार, तस्लीम पटेल, मुन्नी नदाफ, वासंती सत्वे, शिवम्मा रामपूर, मानव्वा सुतार, दुर्गेश प्रसाद, मरिबा कांबळे, जयनारायण राय, रामनाथ सिंग, शरन्नया स्वामी, रायप्पा पुजारी.