Breaking News

वर्षासहल व काव्यवर्षा कार्यक्रम उत्साहात

चिरनेर : प्रतिनिधी

गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोल्ही कोपर (पनवेल) येथील डोंगरावर असलेल्या श्री शंकर व श्री दत्तगुरु मंदिराच्या प्रांगणात अखिल भारतीय साहित्य विकास मंडळाने वर्षासहल व काव्यवर्षा हा कार्यक्रम आयोजित केला होता. सलग तीन वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून, महाप्रसादही असतो.

या कार्यक्रमासाठी आर. सी. घरत, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, धनंजय गोंधळी, साहित्यिक कैलास पिंगळे, गुरुवर्य बळीराम मढवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र नाईक यांनी केले.

ज्येष्ठ कवी हरिभाऊ घरत यांच्या कवितेने कविसंमंलनास सुरुवात झाली. या कविसंमेलनात कवी पुंडलिक म्हात्रे, प्रा. चंद्रकांत मढवी, चंद्रकांत पाटील, कैलास पिंगळे, राजेंद्र नाईक, धनंजय गोंधळी, हरिश्चंद्र माळी, सदानंद ठाकूर, सविता पाटील, जिविता पाटील, विराम उपाध्ये, श्रीकांत पाटील, नारायण ठाकूर, रामचंद्र म्हात्रे (पेण-डोलवी) आदींनी कविता सादर केल्या. रसिकांची चांगली उपस्थिती या वेळी होती.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply