चिरनेर : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या चिरनेर शाखाध्यक्ष पदी क्रियाशील कार्यकर्ते जयेश खारपाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.उरणचे आमदार महेश बालदी यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
भाजपचे मावळते चिरनेर शाखाध्यक्ष रमेश फोफेरकर यांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने आमदार महेश बालदी यांनी जयेश खारपाटील या क्रियाशील कार्यकर्त्याकडे चिरनेर भाजपची धुरा दिली आहे. जयेश खारपाटील यांच्या नियुक्तीने गावातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन नव्या जोमाने संघटना बांधण्याचा मानस जयेश खारपाटील यांनी नियुक्ती नंतर व्यक्त केला आहे. या वेळी मावळते शाखाध्यक्ष रमेश फोफेरकर, नंदकुमार चिरनेरकर, सुशांत पाटील, सुनील पाटील उपस्थित होते.